पाकिस्तानचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक शेन मॅकडरमॉट यांचा राजीनामा: एकीकडे ईसीबीने ब्रेंडन मॅक्क्युलमला मुख्य प्रशिक्षकपदावरून बडतर्फ केले आहे. क्रिकेटविश्वही या धक्क्यातून सावरू शकले नाही, तेवढ्यात पाकिस्तानातून एक धक्कादायक बातमी आली. पाकिस्तान क्रिकेट संघाचे क्षेत्ररक्षक प्रशिक्षक शेन मॅकडरमॉट यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. शेन गेल्या एक वर्षापासून पाकिस्तान संघाचा क्षेत्ररक्षण प्रशिक्षक म्हणून काम पाहत होता.
शेन मॅकडरमॉटचा राजीनामा धक्कादायक आहे कारण काही दिवसांनी पाकिस्तानचा संघ वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर जाणार आहे. दोन्ही संघांमध्ये दोन कसोटी सामने होणार आहेत. त्यानंतर संघ इंग्लंड दौऱ्यावर जाईल, मात्र प्रशिक्षक शेन मॅकडरमॉट संघासोबत नसतील.
पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार, मन्सूर अमजद हे वेस्ट इंडिज आणि इंग्लंड दौऱ्यावर पाकिस्तान संघाचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक म्हणून काम पाहणार आहेत. अमजद हे पाकिस्तान अंडर-19 संघ आणि पाकिस्तान शाहीन संघाचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक राहिले आहेत. शेन मॅकडरमॉटने राजीनामा का दिला याचे कोणतेही कारण पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने उघड केलेले नाही, मात्र ही निश्चितच चिंतेची बाब आहे कारण गेल्या काही वर्षांत पाकिस्तान संघात परदेशी प्रशिक्षकांचे सातत्याने येणे-जाणे सुरू आहे.
हे देखील वाचा: ICC च्या वार्षिक सभेतील 4 मोठे अपडेट्स, वनडे सामने आता 40 षटकांचे होणार का? काय निर्णय घेतले
गॅरी कर्स्टन आणि जेसन गिलेस्पी यांनी मुख्य प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला, तर फिजिओथेरपिस्ट क्लिफ डेकन हे देखील पाकिस्तान क्रिकेट संघाच्या स्टाफमधील त्यांच्या पदावरून पायउतार झालेल्या परदेशी प्रशिक्षकांमध्ये होते.
2025 मध्ये पाकिस्तान संघात येण्यापूर्वी शेन मॅकडरमॉट बांगलादेश क्रिकेट संघात सहाय्यक क्षेत्ररक्षण प्रशिक्षकाची भूमिका तीन वर्षे करत होते. त्याआधी, 3 वर्षे ते श्रीलंका क्रिकेट संघात सहाय्यक क्षेत्ररक्षण प्रशिक्षक पदावर होते. पाकिस्तान क्रिकेट संघाबद्दल बोलायचे झाले तर त्याचा कॅरेबियन दौरा 25 जुलै ते 6 ऑगस्ट या कालावधीत असेल.
हे देखील वाचा:
