Skip to main content

mynavimumbai


इंग्लंडने दुसऱ्या टी-२०साठी एक दिवस आधी प्लेइंग इलेव्हनची घोषणा केली आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा T20 सामना उद्या, शनिवार, 4 जुलै रोजी खेळवला जाणार आहे. मँचेस्टरमध्ये खेळल्या जाणाऱ्या या सामन्यासाठी इंग्लंडने प्लेइंग इलेव्हनची घोषणा केली आहे. दुसऱ्या टी-२०मध्ये इंग्लंडने दोन बदल केले आहेत. जोफ्रा आर्चरचे संघात पुनरागमन झाले आहे, तर एका खेळाडूला पदार्पणाची संधी मिळाली आहे.

वेगवान गोलंदाज जोश टोंगला पदार्पणाची संधी मिळाली आहे. स्टार वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरचे संघात पुनरागमन झाले आहे. साकिब महमूद आणि ल्यूक वुड यांना संघातून वगळण्यात आले आहे. या दोघांच्या जागी टोंग आणि आर्चर यांनी संघात प्रवेश केला आहे.

भारताविरुद्धच्या दुसऱ्या T20 साठी इंग्लंडची प्लेइंग इलेव्हन- फिल सॉल्ट, जोस बटलर (wk), हॅरी ब्रूक (c), जेकब बेथेल, टॉम बँटन, सॅम कुरान, विल जॅक, लियाम डॉसन, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद आणि जोश टोंग.

पहिल्या T20 मध्ये भारताने 190 धावांचे लक्ष्य दिले होते, त्यानंतर पावसामुळे सामना रद्द करण्यात आला.

पहिल्या T20 मध्ये भारताची सुरुवात खूपच खराब झाली होती. संजू सॅमसन (01) आणि इशान किशन (00) स्वस्तात बाद झाले. यानंतर कर्णधार श्रेयस अय्यरसह अभिषेक शर्माने भारतीय डावाची धुरा सांभाळली. अभिषेक शर्माने आपल्या तुफानी शैलीत इंग्लंडच्या गोलंदाजांना झोडपून काढले. अभिषेकने अवघ्या 24 चेंडूत 59 धावांची शानदार खेळी केली. तर श्रेयस अय्यरने 47 चेंडूत 68 धावा केल्या. अखेरीस शिवम दुबे 21 चेंडूत 42 धावा करून नाबाद राहिला. भारताचा डाव संपताच पाऊस सुरू झाला. यानंतर सामना सुरू होऊ शकला नाही. प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर सामना रद्द झाल्याचे घोषित करण्यात आले.

हेही वाचा-

रात्री उशिरापर्यंत जागे राहावे लागणार नाही, भारत-इंग्लंड टी-20 सामन्याची वेळ बदलली; यावेळी दुसरा सामना सुरू होईल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *