‘करो किंवा मरो’ सामन्यात पंजाब किंग्जचा कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. लखनौ सुपर जायंट्स प्रथम फलंदाजीसाठी उतरतील. प्लेऑफच्या आशा जिवंत ठेवण्यासाठी पंजाबला हा सामना कोणत्याही परिस्थितीत जिंकावाच लागेल. तर ऋषभ पंतचा लखनौ आधीच प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. आज दोन्ही संघांच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत. लखनौने अर्जुन तेंडुलकरला पदार्पणाची संधी दिली आहे.
पंजाब किंग्जचा कर्णधार श्रेयस अय्यर काय म्हणाला?
नाणेफेकनंतर पंजाब किंग्जचा कर्णधार श्रेयस अय्यर म्हणाला, “आम्ही प्रथम गोलंदाजी करू. आम्ही दोन बदल केले आहेत. मार्को जॅनसेन आणि विजयकुमार वैशाक संघात परतले आहेत. वातावरण खूप उत्साहवर्धक आहे, मला वाटते की आमच्यासाठी हा करा किंवा मरो सामना आहे. आम्ही याआधी अशा परिस्थितीत कधीच नव्हतो आणि मुले त्यांचे सर्वोत्तम देण्यास तयार आहेत.”
लखनऊचा कर्णधार ऋषभ पंत काय म्हणाला?
नाणेफेक नंतर लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार ऋषभ पंत म्हणाला, “आम्हाला प्रथम गोलंदाजी करायची होती. ही विकेट क्रिकेटसाठी चांगली आहे, गोलंदाजी आणि फलंदाजी दोन्हीसाठी. ही फलंदाजीसाठी सर्वोत्तम विकेट आहे, त्यामुळे हा उच्च धावसंख्येचा सामना असू शकतो. आम्ही दोन बदल केले आहेत. अर्जुन तेंडुलकर आणि अर्शीन कुलकर्णी संघात सामील झाले आहेत. हा मोसम खूप कठीण गेला आहे, पण वैयक्तिकरित्या मलाही खूप काही शिकायला मिळाले आहे. चाहत्यांची मी माफी मागू इच्छितो, ते संपूर्ण उत्तर प्रदेशातून आले आहेत, आमच्यासाठी ही कठीण वेळ आहे, परंतु आज आम्ही आमचे 100% देऊ.
पंजाब किंग्जची प्लेइंग इलेव्हन- प्रभसिमरन सिंग (यष्टीरक्षक), प्रियांश आर्य, कूपर कॉनोली, श्रेयस अय्यर (कर्णधार), सूर्यांश शेडगे, शशांक सिंग, अजमतुल्ला ओमरझाई, मार्को जॅनसेन, विजयकुमार वैशाक, अर्शदीप सिंग आणि युझवेंद्र चहल.
लखनौ सुपर जायंट्सची प्लेइंग इलेव्हन- जोश इंग्लिस, अर्शीन कुलकर्णी, निकोलस पूरन, आयुष बडोनी, ऋषभ पंत (यष्टीरक्षक/कर्णधार), अब्दुल समद, मुकुल चौधरी, अर्जुन तेंडुलकर, मोहम्मद शमी, प्रिन्स यादव आणि मोहसिन खान.
हेही वाचा-
पंजाब आज लखनौमधून विजयी, अजूनही प्लेऑफसाठी पात्र ठरणार नाही, काय आहे समीकरण











