Skip to main content

mynavimumbai


राजस्थान रॉयल्सने पंजाब किंग्जचा 6 गडी राखून पराभव केला आहे. मुल्लानपूरच्या मैदानावर राजस्थानने शेवटच्या षटकात विजय मिळवला. राजस्थानने 223 धावांचे लक्ष्य चार चेंडूत पूर्ण केले. पंजाब किंग्जने प्रथम खेळून 222 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात राजस्थानने चार चेंडू राखून लक्ष्य गाठले. राजस्थानला विजयासाठी शेवटच्या 6 षटकात 72 धावा करायच्या होत्या. चार विकेट पडल्या होत्या. त्यानंतर डोनोव्हर फरेरा आणि शुभम दुबे यांनी एकही विकेट पडू दिली नाही आणि चार चेंडू शिल्लक असताना लक्ष्याचा पाठलाग केला. फरेरा 26 चेंडूत 52 धावा करून नाबाद तर शुभम 12 चेंडूत 31 धावा करून नाबाद माघारी परतला. तत्पूर्वी, यशस्वी जैस्वालने 27 चेंडूत 51 धावा आणि वैभव सूर्यवंशीने 16 चेंडूत 43 धावा केल्या. अर्शदीप सिंगने चार षटकांत ६८ धावा दिल्या. आयपीएल 2026 मधील पंजाब किंग्जचा हा पहिला पराभव आहे.

राजस्थान रॉयल्सने पंजाब किंग्जचा 6 गडी राखून पराभव केला आहे. आयपीएल 2026 च्या हंगामातील पंजाब संघाचा हा पहिला पराभव आहे. न्यू चंदीगड येथील आपल्या घरच्या मैदानावर खेळत असलेल्या पंजाबच्या संघाला २२२ धावांच्या विशाल धावसंख्येचा बचाव करता आला नाही. राजस्थानने या मैदानावर सर्वाधिक धावांचा पाठलाग केला आहे. आयपीएलच्या इतिहासातील हा त्याचा तिसरा सर्वात मोठा धावांचा पाठलाग होता.

या सामन्यात पंजाब किंग्जने प्रथम खेळून मार्कस स्टॉइनिस आणि प्रभसिमरन सिंग यांच्या अर्धशतकांच्या जोरावर 20 षटकांत 222 धावा केल्या. प्रत्युत्तरात राजस्थान रॉयल्सने 19.2 षटकांत लक्ष्य गाठले. डोनोव्हान फरेराने षटकार ठोकत संघाला विजय मिळवून दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *