Skip to main content

mynavimumbai


अरुण जेटली स्टेडियमच्या पाटा विकेटवर प्रथम खेळून मुंबई इंडियन्स संघाला केवळ 162 धावा करता आल्या. दिल्लीच्या गोलंदाजांनी सुरुवातीपासूनच कडक लाईन लेन्थने गोलंदाजी केली आणि ठराविक अंतराने विकेट घेत मुंबईच्या फलंदाजांना मोठी धावसंख्या होऊ दिली नाही. मुंबईकडून कर्णधार सूर्यकुमार यादवने 36 चेंडूत 51 धावांची खेळी केली. त्याच्या बॅटमधून तीन चौकार आणि दोन षटकार आले. तर रोहित शर्माने 26 चेंडूत 35 धावा केल्या. दिल्लीकडून पाच गोलंदाजांनी विकेट घेतल्या.

दिल्ली कॅपिटल्ससमोर आता केवळ 163 धावांचे लक्ष्य आहे. दिल्लीकडे चांगली फलंदाजी आहे. अशा परिस्थितीत मुंबई इंडियन्ससाठी हा सामना जिंकणे खूप कठीण आहे. प्रथम खेळताना मुंबई इंडियन्सने 20 षटकांत 6 बाद 162 धावा केल्या आहेत.

अशी होती मुंबई इंडियन्सची खेळी

नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या मुंबई इंडियन्सची सुरुवात चांगली झाली नाही. तिसऱ्या षटकात रायन रिक्लेटन बाद झाला. त्याने 11 चेंडूत केवळ 9 धावा केल्या. यानंतर टिळक वर्मा शून्यावर बाद झाला. मुकेश कुमारने दोघांनाही एकाच षटकात पॅव्हेलियनमध्ये परत पाठवले.

18 धावांवर दोन विकेट पडल्या तेव्हा रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव यांच्यात 53 धावांची भागीदारी झाली. रोहितने 26 चेंडूत 35 धावा केल्या. त्याच्या बॅटमधून 5 चौकार आणि एक षटकार आला. सूर्यकुमारने 36 चेंडूंत 3 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 51 धावांची खेळी केली.

शेवटी नमंधीरने 21 चेंडूत 28 धावा केल्या. त्याच्या बॅटमधून दोन चौकार आणि एक षटकार आला. मिचेल सँटनर 13 चेंडूत 18 धावा करून नाबाद तर कॉर्बिन बॉश चार चेंडूत 11 धावा करून नाबाद माघारी परतला. सँटनर आणि बॉश या दोघांनी प्रत्येकी दोन चौकार मारले.

दिल्लीकडून मुकेश कुमारने 3 षटकांत 26 धावा देत 2 बळी घेतले. तर लुंगी नागिडी, अक्षर पटेल, विपराज निगम आणि टी नटराजन यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *