T20 विश्वचषक 2026 आता सर्वात रोमांचक टप्प्यावर पोहोचला आहे. वेस्ट इंडिजविरुद्ध ५ गडी राखून शानदार विजय मिळवत भारताने उपांत्य फेरीचे तिकीट निश्चित केले आहे. यासह स्पर्धेतील चार उपांत्य फेरीतील संघही निश्चित झाले आहेत. आता भारताचा पुढील सामना कधी होणार, कोणत्या संघासोबत आणि कोणत्या मैदानावर होणार याकडे चाहत्यांच्या नजरा खिळल्या आहेत.

भारत विरुद्ध इंग्लंड उपांत्य फेरीत 2

भारतीय संघाचा उपांत्य फेरीचा सामना ५ मार्च रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. या महत्त्वाच्या सामन्यात टीम इंडियाचा सामना इंग्लंडशी होणार आहे. हा सामना दोन्ही संघांसाठी खूप महत्त्वाचा आहे, कारण विजयी संघ थेट अंतिम फेरीत प्रवेश करेल.

ग्रुप स्टेजमध्ये भारताची कामगिरी दमदार होती. या संघाने आपल्या मोहिमेची सुरुवात अमेरिकेविरुद्ध विजयाने केली आणि नंतर नामिबिया, पाकिस्तान आणि नेदरलँड्सचा पराभव करून सुपर-8 मध्ये स्थान मिळवले. मात्र, सुपर-8 च्या पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 76 धावांनी मोठा पराभव झाल्याने संघाच्या अडचणी वाढल्या होत्या. मात्र, यानंतर भारताने झिम्बाब्वेला हरवून पुनरागमन केले आणि त्यानंतर वेस्ट इंडिजचा पराभव करत उपांत्य फेरीचे तिकीट मिळवले.

दुसरीकडे, इंग्लंडचा संघही जबरदस्त लयीत असल्याचे दिसत आहे. सुपर-8 मध्ये इंग्लंडने श्रीलंका आणि पाकिस्तानसारख्या बलाढ्य संघांना पराभूत केले. याशिवाय न्यूझीलंडविरुद्धच्या विजयाने त्यांचा आत्मविश्वास आणखी वाढला आहे. अशा परिस्थितीत भारत आणि इंग्लंड यांच्यातील हा सामना चुरशीचा ठरू शकतो.

पहिला उपांत्य सामना: दक्षिण आफ्रिका विरुद्ध न्यूझीलंड

स्पर्धेतील पहिला उपांत्य सामना 4 मार्च रोजी कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर खेळवला जाईल. या सामन्यात दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंडचे संघ आमनेसामने असतील. या स्पर्धेत दक्षिण आफ्रिका हा एकमेव संघ आहे जो आतापर्यंत अजिंक्य राहिला आहे. एवढेच नाही तर प्रोटीज संघाने भारताची विजयी घोडदौड थांबवली आणि सुपर-8 मध्ये 76 धावांनी पराभूत केले.

अंतिम सामना कधी आणि कुठे होणार?

दोन्ही उपांत्य फेरीतील विजयी संघ 8 मार्च रोजी अहमदाबादमध्ये आमनेसामने येतील. नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये विजेतेपदासाठी स्पर्धा होईल. आता भारत इंग्लंडला पराभूत करून अंतिम फेरीत धडक मारतो की नाही हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. आगामी काही दिवस चाहत्यांसाठी खूप रोमांचक असणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *