April 7, 2025
Navi Mumbai Mahanagar Palika Bharti 2025: सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी नवी मुंबई महानगरपालिकेकडून मोठी भरती प्रक्रिया सुरू झालेली आहेत. गट-क आणि गट-ड संवर्गातील एकूण 620 रिक्त पदां साठी 10 वी, 12 वी आणि पदवीधर पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहे. ही भरती सरळसेवा पद्धतीने केली जाणार आहेत, इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावीत.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या आस्थापनेतील या भरतीसाठी राज्य सरकारची मान्यता प्राप्त झालेली असून, विविध विभागांत नोकरीसाठी ही मोठी संधी उपलब्ध झालेली आहेत. निवड झालेल्या उमेदवारांना ₹19,900 ते ₹63,200 दरमहा वेतन दिले जाणार आहेत. प्रत्येक पदासाठी शैक्षणिक पात्रता वेगवेगळी आहे, त्यामुळे उमेदवारांनी अधिकृत PDF जाहिरात तपासून अर्ज करावा. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी अधिकृत लिंक खाली दिली आहेत

नवी मुंबई महानगरपालिका भरती 2025 – अर्ज प्रक्रिया, पात्रता आणि महत्त्वाची माहिती
- अर्ज पद्धती: फक्त ऑनलाइन (Online) अर्ज स्वीकृत
- वयोमर्यादा: 18 ते 38 वर्षे (शिथिलतेसाठी अधिकृत जाहिरात पाहा)
- भरती प्रकार: कायमस्वरूपी (Permanent) सरकारी नोकरीची संधी
अर्ज शुल्क:
- खुला प्रवर्ग: ₹1000/-
- मागासवर्गीय: ₹900/-
- पदसंख्या: 620 नवीन रिक्त पदे
पदाचे प्रकार
- कक्षसेवक (वॉर्डबॉय), कक्षसेविका/आया, शवविच्छेदन मदतनीस, लेखा लिपिक, लिपीक-टंकलेखक, उद्यान सहाय्यक, ध्वनीचालक, वायरमन, सहाय्यक ग्रंथपाल, शस्त्रक्रियागृह सहाय्यक, बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी (हिवताप), ANM, पशुधन पर्यवेक्षक, बायोमेडिकल इंजिनियर सहाय्यक, आरोग्य सहाय्यक (महिला), औषध निर्माता, नेत्र चिकित्सा सहाय्यक, आहार तंत्रज्ञ, सुपरवायझर, CSSD तंत्रज्ञ, ECG तंत्रज्ञ, सांख्यिकी सहाय्यक, डायलिसिस तंत्रज्ञ, स्टाफ नर्स, डेंटल हायजिनिस्ट, वैद्यकीय समाजसेवक, सहाय्यक माहिती व जनसंपर्क अधिकारी, उद्यान अधीक्षक, कनिष्ठ अभियंता (बायोमेडिकल/स्थापत्य), बायोमेडिकल इंजिनियर.
- नोकरी ठिकाण: नवी मुंबई
- शैक्षणिक पात्रता: पदानुसार पात्रता वेगवेगळी आहे, कृपया अधिकृत जाहिरात वाचा
- परीक्षा दिनांक: प्रवेशपत्रात नमूद केले जाईल
- अर्ज करण्याची अंतिम तारीख: 11 मे 2025
- अधिकृत संकेतस्थळ: www.nmmc.gov.in
महत्त्वाची सूचना:
भरती प्रक्रियेतील संभाव्य बदल, परीक्षा केंद्र आणि वेळ यासंबंधी नवी मुंबई महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर वेळोवेळी अपडेट मिळणार आहेत. तसेच, संवर्गनिहाय पदसंख्या, निवड प्रक्रिया, वेतनश्रेणी, परीक्षा शुल्क आणि अभ्यासक्रमाची सविस्तर माहिती अधिकृत जाहिरातीत उपलब्ध आहेत