भारतीय कर्णधार श्रेयस अय्यरने झिम्बाब्वेविरुद्धच्या 90 धावांच्या विजयानंतर सांगितले की, वेगवान गोलंदाज प्रिन्स यादवच्या दुखापतीमुळे रविवारी खेळल्या जाणाऱ्या तिसऱ्या आणि अंतिम टी-20 सामन्यात संघाला काही बदल करावे लागतील. प्रिन्स यादवने आपल्या दुसऱ्या षटकाचा दुसरा चेंडू टाकताना स्नायूंच्या ताणामुळे मैदान सोडले. दुखापत होण्यापूर्वी त्याने दोन बळी घेतले होते.

दुसऱ्या T20 मध्ये भारताने प्रथम खेळून 20 षटकात 5 विकेट गमावत 219 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात यजमान झिम्बाब्वेचा संघ १७.५ षटकांत १२९ धावाच करू शकला. भारताकडून इशान किशनने 81 धावांची शानदार खेळी तर टिळक वर्माने 60 नाबाद खेळी खेळली. या विजयासह टीम इंडियाने तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे.

दुसऱ्या टी-२०मध्ये भारताच्या विजयानंतर श्रेयस अय्यर म्हणाला, “दुर्दैवाने आमचा एक खेळाडू दुखापतग्रस्त आहे, त्यामुळे उद्याच्या (रविवार) सामन्यात संघात काही बदल दिसू शकतात.”

अय्यर पुढे म्हणाला, “इशान आणि टिळक यांनी शानदार फलंदाजी केली. मला वाटले होते की या विकेटवर 180 ते 200 धावा ही स्पर्धात्मक धावसंख्या असेल, पण आम्ही 220 धावा केल्या, जे संघासाठी बोनस ठरले. हीच वृत्ती आपण मैदानावर ठेवली पाहिजे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वर्तमानात राहून आपल्या योजना अधिक चांगल्या पद्धतीने राबवणे.”

युवा संघाच्या निर्भय वृत्तीबद्दल अय्यर म्हणाला, “होय, खेळाकडे पाहण्याचा हाच दृष्टिकोन आहे. मला वाटते की हे सर्व वृत्तीवर अवलंबून असते. भूतकाळातील कामगिरीवर जास्त लक्ष केंद्रित करू नका. पुढे जात राहा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे वर्तमानावर लक्ष केंद्रित करा. तुम्हाला मिळालेल्या प्रत्येक संधीचा पुरेपूर फायदा घ्यायचा आहे. उद्या आणखी एक संधी आहे, त्यामुळे आम्ही त्याची वाट पाहत आहोत.”

हेही वाचा-

हॅरी ब्रूकला कर्णधारपद मिळणार नाही, हा अनुभवी खेळाडू इंग्लंडचा नवा कसोटी कर्णधार होणार आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *