15 वर्षीय वैभव सूर्यवंशी याचे स्वप्न पूर्ण झाले आहे. त्याला इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-२०मध्ये संधी मिळाली आहे. भारताकडून पदार्पण करणारा तो सर्वात तरुण क्रिकेटपटू ठरला आहे. मँचेस्टर येथे खेळल्या जात असलेल्या दुसऱ्या T20 सामन्यात भारतीय कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इंग्लंडचा संघ प्रथम गोलंदाजी करेल. दोन्ही संघांच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल करण्यात आले आहेत.
संजू सॅमसनच्या जागी वैभव सूर्यवंशीला संधी मिळाली आहे. सॅमसनने 2026 च्या टी-20 विश्वचषकाचे विजेतेपद भारताला जिंकून देण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले होते, परंतु तो परदेशी भूमीवर सतत फ्लॉप होत होता. त्याचवेळी जगभरातील क्रिकेट चाहते आणि माजी क्रिकेटपटू वैभव सूर्यवंशीला संधी देण्याची वकिली करत होते.
इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या T20 सामन्यात भारताने संजू सॅमसनला वगळून त्याच्या जागी वैभव सूर्यवंशीला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान दिले आहे. सॅमसनला आतापर्यंत गेल्या तीन टी-20 डावांमध्ये केवळ 6 धावा करता आल्या होत्या. वैभव सूर्यवंशी आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा सर्वात तरुण भारतीय ठरला आहे. त्याने सचिन तेंडुलकरचा 37 वर्ष जुना विक्रम मोडला आहे.
सचिनने 1989 मध्ये वयाच्या 16 वर्षे 205 दिवसात पाकिस्तानविरुद्ध पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. आता वैभव सूर्यवंशीने वयाच्या अवघ्या १५ वर्षे ९९ दिवसांत भारतासाठी पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळला. इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात तो प्लेइंग इलेव्हनचा भाग आहे.
भारताचे प्लेइंग इलेव्हन- वैभव सूर्यवंशी, अभिषेक शर्मा, इशान किशन (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर (कर्णधार), टिळक वर्मा, शिवम दुबे, हर्षित राणा, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग आणि वरुण चक्रवर्ती.
इंग्लंडचे प्लेइंग इलेव्हन- फिल सॉल्ट, जोस बटलर (wk), हॅरी ब्रूक (c), जेकब बेथेल, टॉम बँटन, सॅम कुरान, विल जॅक, लियाम डॉसन, आदिल रशीद, जोफ्रा आर्चर, जोश टोंग.
हेही वाचा-
लिओनेल मेस्सीने केला ‘विश्वविक्रम’, फिफा विश्वचषकात असे करणारा जगातील पहिला खेळाडू ठरला.











