बेलापूर मतदारसंघांमध्ये महायुतीतील तिकिटावरून चांगलेच राजकारण रंगलेले पाहायला मिळत आहे. बेलापूर मतदार संघाच्या भाजपच्या स्थानिक आमदार मंदा म्हात्रे आहेत. मात्र शिंदे गटाचे विजय नाहटा हे निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. नवी मुंबईतील शिवसेनेचे उपनेते विजय नाहटा यांनी बेलापूर मतदारसंघांतून विधानसभा निवडणुक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याअनुषंगाने तयारी देखील जोरदार सुरू आहे, मात्र भाजपने ऐरोली आणि बेलापूर मतदारसंघावर दावा केल्याने शिंदे गटाच्या शिवसेना पक्षाला नवी मुंबईतील एकही जागा सुटत नसल्यामुळे विजय नाहटा तुतारी हातात घेण्याची शक्यता आहे.
शिवसेना पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनीही यावेळी बेलापूर विधान सभेचे तिकीट विजय नाहटा यांच्यासाठीच राखीव केले जाईल, असं म्हटलं होतं. मात्र आता त्यांना तिकीट मिळणार नसल्याची चर्चा आहे. विजय नाहटा यांना हे तिकीट सोडावे असे बीजेपी आणि स्वयंसेवकांची भावना होती. पण तिकीट मिळत नसल्यामुळे बीजेपी आणि आर.एस.एस मध्येही नाराजीचे सूर उमटत आहेत. इतकी वर्षे पक्षाच्या विचारांशी बांधील राहून मधल्या काळात शिवसेनेच्या संघर्षाच्या काळात शिंदे साहेबांच्या सोबत खंबीरपणे उभे राहूनही, अशाप्रकारे अन्याय होत असल्याची भावना कार्यकर्त्यांमधून व्यक्त होत आहे.
शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी कोणत्याही परिस्थितीत बेलापूर विधान सभा आपल्यासाठी राखून ठेवलीच पाहिजे होती, पण त्यात पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनाही यशस्वी होता आले नाही, असा निर्णय कार्यकर्त्यांना मान्य नाही अशी भावना आता व्यक्त होत आहे. त्यामुळे पुढील काळात बेलापूर विधानसभेत राजकीय भूकंप झाला तर शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी त्याचे आश्चर्य वाटून घेऊ नये.
२०१९ मध्येही विजय नाहटा यांचे तिकीट कापले गेले होते आणि आपल्याला पुढील वेळी नक्की तिकीट देऊ पक्षाची शिस्त पाळून सयंम ठेवा, असा सल्लाही देण्यात आला होता. त्यामुळे आता अन्याय सहन केला जाणार नाही, नवी मुंबईत राजकीय उद्रेक झाला तर वरिष्ठांनी आश्चर्यचकित होऊ नये, असे विजय नाहटा म्हणाले.