पनवेल महानगर पालिका यांचा दिनांक ९ ऑक्टोंबर २०२४ रोजी सकाळी ०१.०० ते संध्याकाळी ०५.३० कालावधीत माणगाव येथे महिला सशक्तिकरण या संदर्भात कार्यक्रम आयोजित केला आहे या कार्यक्रमाला माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब उपस्थित राहून महिलांना महिला सशक्तिकरण या संदर्भात मार्गदर्शन करणार आहेत.
कार्यक्रमासाठी सर्व बचत गट/ लाडकी बहीण योजना लाभार्थी/ पी.एम. स्व-निधी योजना लाभार्थी/ समृद्धी योजना लाभार्थी यांना आमंत्रित केले आहे.
सर्व बचत गट/ लाडकी बहीण योजना लाभार्थी/ पी.एम. स्व-निधी योजना लाभार्थी/ समृद्धी योजना लाभार्थी सभासदांना विनंती आहे की या कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी.
या कार्यक्रमाला जाण्या-येण्यासाठी पालिकेने बसची सोय उपलब्ध करून दिली.