शारदीय नवरात्रोत्सव सुरू झाला आहे. या सणाच्या 9 दिवसांमध्ये दुर्गेच्या विविध रूपांची पूजा केली जाते. हिंदू धर्मात या सणाला विशेष महत्त्व आहे. या सणादरम्यान मोठ्या संख्येने भक्त भाविक उपास करतात. उपास करणं हे फक्त धार्मिक नव्हे तर ते तब्येतीसाठी देखील खूप फायदेशीर असतं. मात्र कोणताही उपास करताना काळजी घेणंही तितकंच महत्वाचं असतं. या काळात थोडाही निष्काळजीपणा केला तर तुमचे आरोग्य बिघडू शकते. अशा परिस्थितीत नवरात्रीच्या काळात उपास करण्याची योग्य पद्धत जाणून घेणे तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे. नवरात्रीमध्ये उपास कसा करावा, त्यामुळे आरोग्य चांगले राहावे, यासाठी तज्ज्ञ काय सांगतात ते जाणून घेऊया.
आज घटस्थापना… शारदीय नवरात्रीला आजपासून सुरूवात झाली आहे. नवरात्रीनिमित्त देवीची पूजा केली जाते, बरेच लोक 9 दिवस उपास करत असतात.तुम्हीदेखील उपास तर त्याची योग्य पद्धत तज्ज्ञांकडून जाणून घ्या. त्यामुळे तुमच्या आरोग्यावर कोणताही विपरीत परिणाम होणार नाही.
हायड्रेटेड रहा
पुरेशा प्रमाणात पाणी पिणे फार महत्वाचे आहे. नवरात्रीत उपास करताना भरपूर पाणी प्या. यामुळे शरीराचे निर्जलीकरण होणार नाही. किमान 2 ते 3 लिटर पाणी प्या. शरीर हायड्रेटेड राहिल्यास, इलेक्ट्रोलाइट शिल्लक राहते.
तेलकट खाणं टाळा
उपास करताना लोक अनेकदा तळलेले अन्न, पदार्थ खातात. पण तेलकट गोष्टीमुळे नुकसान होऊ शकते. यामुळे हृदयविकाराचा धोका वाढू शकतो. विशेषत: ज्यांना मधुमेह किंवा कोलेस्ट्रॉलची समस्या आहे त्यांनी तेलकट पदार्थ किंवा स्नॅक्स खाऊ नयेत. त्याऐवजी फळे किंवा रताळे यांसारखे पदार्थ खावेत.
जास्त वेळ पोट रिकामं ठेवू नका
काही लोक उपास करताना दीर्घकाळ काहीही खात किंवा पीत नाहीत. परंतु तज्ञांचे म्हणणे आहे की तुम्ही ते नियम पाळावेत जे पाहिजेत जे तुम्ही पूर्णपणे पाळू शकता. जास्त वेळ रिकाम्या पोटी राहिल्याने समस्या निर्माण होऊ शकतात. दर 2 ते 3 तासांनी काहीतरी खात राहा.उपाशी राहिल्याने लागल्याने ॲसिडिटी किंवा डोकेदुखी सारख्या समस्या उद्भवू शकतात. यामुळे थकवाही लवकर येतो.
हे पदार्थ खा
जर तुम्ही 9 दिवस उपास करत असाल तर प्रोटीनयुक्त पदार्थ नक्की खा. तुमच्या आहारात चीज, दही, दूध आणि बदाम यासारख्या पदार्थांचा समावेश करा. या पदार्थांमधून तुम्हाला भरपूर ऊर्जा मिळेल कारण त्या पचायला थोडा वेळ लागतो, यामुळे तुमचे पोट बराच काळ भरलेले राहते.
या लोकांनी करू नये उपास
ज्यांना मधुमेह, रक्तदाब, क्षयरोग, कर्करोग किंवा इतर कोणताही गंभीर आजार आहे त्यांनी सलग 9 दिवस उपास करू नये, असे न्यूट्रिशनिस्ट सांगतात. गर्भवती महिलांनी देखील 9 दिवस उपास करू नये. अशा लोकांना एक-दोन दिवस उपास करायचा असेल तर प्रथम आरोग्य तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)