रोहित शर्मा 19 जुलै रोजी त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील शेवटचा सामना खेळणार आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा आणि निर्णायक एकदिवसीय सामना लॉर्ड्सच्या मैदानावर खेळवला जाणार असून रोहित या मैदानावर शेवटचा सामना खेळणार असल्याचा दावा मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात आला आहे. मात्र, रोहित किंवा बीसीसीआयकडून याबाबत कोणतीही पुष्टी झालेली नाही.
रोहित शर्माच्या निवृत्तीच्या अफवा पसरण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चे विजेतेपद पटकावले, त्यानंतरही रोहितच्या निवृत्तीबाबत विविध दावे करण्यात आले. 7 मे रोजी त्याने कसोटी फॉरमॅटला अलविदा केला होता. त्यानंतर ‘हिटमॅन’ म्हणाला होता की, जेव्हा त्याचे मन ‘नो मोअर’ म्हणेल, तेव्हा तो क्रिकेटला अलविदा करेल.
रोहित शर्मा निवृत्तीबद्दल काय विचार करतो?
गेल्या वर्षी जेव्हा रोहित शर्मा त्याच्या कसोटी निवृत्तीनंतर एका मुलाखतीत म्हणाला होता, “ज्या दिवशी मला वाटेल की मी मैदानावर जे करू इच्छितो ते मी करू शकत नाही, तेव्हा मी खेळणे थांबवतो. पण सध्या, मला विश्वास आहे की मी जे करतोय ते संघाला मदत करत आहे.”
रोहित खरोखरच निवृत्त होणार का?
खरं तर, द इंडियन एक्स्प्रेसमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, निवडकर्त्यांनी रोहित शर्माला 2027 च्या विश्वचषक स्पर्धेच्या प्लॅनमध्ये समाविष्ट नसल्याचे सांगितले आहे. पुढील वर्षी होणाऱ्या विश्वचषकासाठी निवडकर्त्यांना यशस्वी जैस्वालला संधी द्यायची आहे, जी बऱ्याच दिवसांपासून संधीची वाट पाहत आहे. मात्र, याबाबत अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
हे देखील वाचा:
India vs England: टीम इंडियाला मोठा धक्का, हा खेळाडू IND vs ENG तिसऱ्या ODI मधून बाहेर
