17 जून 2026 पासून ऑस्ट्रेलिया आणि बांग्लादेश यांच्यात तीन दिवसीय T20 मालिका खेळवली जाणार आहे. त्यासाठी ऑस्ट्रेलियाने आपला T20 संघ जाहीर केला आहे. बांगलादेशविरुद्धच्या टी-20 सामन्यासाठी निखिल चौधरीची ऑस्ट्रेलियन संघाने निवड केली आहे.
निखिल चौधरी हा भारतातील असून त्याचा जन्म दिल्लीत झाला. बिग बॅश लीगमधील चमकदार कामगिरीनंतर निखिल चौधरीला ऑस्ट्रेलियन संघात स्थान मिळाले आहे. निखिल चौधरी 30 वर्षांचा असून तो एक उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू आहे.
सर्व काही व्यवस्थित राहिल्यास, निखिल 60 वर्षांहून अधिक काळ ऑस्ट्रेलियाकडून खेळणारा पहिला भारतीय वंशाचा पुरुष क्रिकेटपटू बनेल. होबार्ट हरिकेन्सचा हा 30 वर्षीय अष्टपैलू खेळाडू आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सचा भाग आहे.
निखिल चौधरीसाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळवणे इतके सोपे नसेल. लेग-स्पिनिंग अष्टपैलू निखिलला मधल्या फळीत जोएल डेव्हिस आणि ॲरॉन हार्डीसारख्या खेळाडूंचा सामना करावा लागेल. निखिल चौधरीने गेल्या महिन्यात पाकिस्तानला रवाना होण्यापूर्वी ऑस्ट्रेलियाच्या व्हाईट-बॉल ग्रुपसोबत सराव केला होता.
निवडकर्ता टोनी डोडामेड यांनी निखिल चौधरीबद्दल सांगितले की, त्याच्या बीबीएल फॉर्मने, विशेषत: गेल्या हंगामातील त्याच्या कामगिरीने पॅनेल प्रभावित झाले. त्यामुळे निखिलचा संघात समावेश करण्यात आला आहे. निखिल चौधरीला बांगलादेशमध्ये खूप चांगला अनुभव मिळेल. पुढील आठवड्यात येथे होणाऱ्या पहिल्या T-20 सामन्यासाठी आम्ही जेव्हा संघ निवडतो, तेव्हा निखिल चौधरी ऑस्ट्रेलियासाठी पहिला सामना खेळण्याच्या शर्यतीत असेल.
ट्रॅव्हिस हेडचा सुरुवातीला बांगलादेशविरुद्धच्या दोन्ही मर्यादित षटकांच्या संघात समावेश करण्यात आला होता. पण नंतर ट्रॅव्हिस हेडला वैयक्तिक रजा देण्यात आली. ऑस्ट्रेलियन संघातील ट्रॅव्हिस हेडच्या अनुपस्थितीमुळे पुढील आठवड्यात चट्टोग्राम येथे होणाऱ्या टी-२० सामन्यासाठी खेळाडूंची गरज होती. ऑस्ट्रेलिया संघाचा कर्णधार मिचेल मार्श देखील घोट्याच्या दुखापतीमुळे एकदिवसीय सामन्यातून बाहेर आहे. पण, तो लवकर बरा होईल आणि टी-20 मालिकेत ऑस्ट्रेलियन टी-20 संघाचे नेतृत्व करू शकेल, असा त्याला विश्वास आहे.
ऑस्ट्रेलिया T20 संघ
मिचेल मार्श (कर्णधार), झेवियर बार्टलेट, निखिल चौधरी, कूपर कोनेली, टिम डेव्हिड, नॅथन एलिस, जोएल डेव्हिस, कॅमेरॉन ग्रीन, आरोन हार्डी, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, स्पेन्सर जॉन्सन, मॅथ्यू कुह्नेमन, जोश फिलिप, रिले मेरिडिथ, मॅथ्यू ऍडमशा आणि मॅथ्यू री.










