सनरायझर्स हैदराबादने हा सामना 47 धावांनी जिंकला. 243 धावांचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्सचा संघ 195 धावाच करू शकला. दिल्ली कॅपिटल्ससाठी नितीश राणाने 30 चेंडूत 57 धावा, केएल राहुलने 23 चेंडूत 37 धावा आणि समीर रिझवीने 28 चेंडूत 41 धावा केल्या. मात्र, या सर्वांनाच आपल्या संघाच्या पराभवाचे अंतर कमी करता आले. सनरायझर्स हैदराबादकडून फलंदाजीत अभिषेक शर्माने १३५ धावांची खेळी केली, तर गोलंदाजीत इशान मलिंगा आणि साकिब हुसेन चमकले. मलिंगाने 4 षटकात 32 धावा देत चार बळी घेतले. साकिब हुसेननेही शानदार गोलंदाजी केली. त्याला एकच विकेट मिळाली असली तरी त्याने अतिशय किफायतशीर गोलंदाजी केली. साकिबने चार षटकांत २९ धावा देत एक बळी घेतला. हैदराबादचा घरच्या मैदानावर हा सलग तिसरा विजय आहे.










