पनवलेमध्ये 5 बांगलादेशी गजाआड, भारतीय नागरिकालाही ठोकल्या बेड्या, गुन्हे शाखेची कारवाई

Facebook
Twitter
LinkedIn
Pinterest
Pocket
WhatsApp
my-navi-mum

पनवेलमध्ये बेकायदेशीरपणे वास्तव्य बनलेले 5 बांगलादेशींवर पोलिसांनी ताबा घेतला तर सोबतच सहा व्यक्‍तींचही अटक करून सामानिक आड दिली. बागलादेशी नागरिकांकडेही भारतीय पासपोर्टस अंबाडणारे ओलांडत आले म्हणून.

अमुलकुमार जैन, पनवेल: घुसखोरी करून भारतात आलेल्या काही बांगलादेशियांसोबत सहा जणांना नवी मुंबई गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाच्या पोलिस पथकाने छापा टाकून ताब्यात घेतले.पहलगाम येथील कट्टरवादी हल्ल्यानंतर पनवेल परिसरात बेकायदा वास्तव्य करत असलेल्या बांग्लादेशी आणि पाकिस्तानी नागरिकांविरुध्द पोलिसांनी शोध मोहीम सुरू केली आहे.अशातच क्राइम ब्रँचने पनवेल – करंजाडे येथे बेकायदेशीरपणे राहणाऱ्या बांगलादेशी नागरिकांना अटक केली आहे.

बांग्लादेशी नागरिकांना अटक, भारतीय नागरिकाचे कारनामे
करंजाडेथील एका अपार्टमेंटवर छापा टाकत पोलिसांनी दोन पुरुष आणि तीन महिलांना ताब्यात घेतले. या घटनेत बांगलादेशी नागरिकांना बनावट ओळखपत्रे बनवून देणाऱ्या भारतीय नागरिकालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.अँटी-ह्युमन ट्रॅफिकिंग युनिटच्या पीएसआय सरिता गुदे यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे, 4 मे रोजी करंजाडे, सेक्टर 6 येथील ब्लू क्रेस्ट को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटीमध्ये पोलिसांनी धाड टाकली. तिथे दोन पुरुष आणि तीन महिला राहत असल्याचे झाले. चौकशीत या व्यक्तींनी खुलासा केला की, काहींनी वैध व्हिसावर भारतात प्रवेश केला, परंतु व्हिसाची मुदत संपल्यानंतरही ते बेकायदेशीरीत्या भारतात राहत होते. तर इतरांनी भारत-बांगलादेश सीमेवरून छुप्या मार्गाने भारतात घुसखोरी केल्याचे कबूल केले.

बांगलादेशी नागरिकांकडे आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट
धक्कादायक बाब म्हणजे हे सर्व बांगलादेशी नागरिक असूनही त्यांनी आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदार ओळखपत्र आणि तीन जणांनी तर बनावट कागदपत्रांच्या आधारे भारतीय पासपोर्टदेखील बनवले आहे.अन्ना खातून आकाश गाझी (35 धंदा ब्युटीशियन आणि टेलर), आलो खातून इस्लाम गाझी (31, गृहिणी), इस्त्राफिल इस्लाम गाझी (25 धंदा मजूरी), किया आकाश गाझी (21, विद्यार्थिनी), आकाश लतीफ गाझी (40 धंदा रिक्षाचालक) अशी अटक करण्यात आलेल्या बांगलादेशी नागरिकांची नावे असून हे सर्व करंजाडेमध्ये राहत होते. याप्रकरणी पनवेल शहर पोलिस ठाण्यात विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पनवेल सत्र दिवाणी न्यायालयात हजर केले असता, 9 मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

याकामी उपायुक्त अमित काळे यांच्यासह सहाय्यक पोलिस आयुक्त अजयकुमार लांडगे, धर्मपाल बनसोडे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक पृथ्वीराज घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सरिता गुडे, महिला पोलिस हवालादार मांडोळे, पोलिस शिपाई चव्हाण, ठाकूर, कोलते, घोनसेकर, म्हात्रे, अडकमोल, हांडे आदीनी कारवाईत सहभाग घेतला होता.

Facebook
Twitter
LinkedIn
Pinterest
Pocket
WhatsApp

Never miss any important news. Subscribe to our newsletter.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *