
दापोली येथील ज्येष्ठ साहित्यिक इकबाल शर्फ मुकादम यांच्या साहित्यिक कारकीर्दीस पांच दशकं पूर्ण झाली असून आजही विविध नियकालिकामधून त्यांचे लिखाण प्रकाशित होत आहे. सोशल मीडियावर त्यांच्या
लेखणीचा चाहता वर्ग मोठा आहे शिवाय ते अधूनमधून ब्लॉगवर सामाजिक विचार शेर करत असतात. त्यांनी निर्माण केलेली स्वरचित मराठी-हिंदी म्युझिकल एलबम्स युट्यूबवर उपलब्ध आहेत. श्री. मुकादम लिखित काही निवडक मराठी कथा आतां युट्यूबवर ऑडिओ ऐकता येतील. अशा या बहुआयामी व्यक्तिमत्त्व लाभलेल्या कोकणस्थ व्यक्तीच्या लेखणीला सन्मानित करण्याचे बहुजन हितवर्धक कला संस्थेच्या वतीने नुकतेच लेखी जाहीर केले आहे. कोकणरत्न २०२५ हा पुरस्कार परळ-मुंबई, बौद्ध पंचायत समिती सभागृहात रविवार दिनांक ६ एप्रिल रोजी मान्यवरांच्या हस्ते श्री. इक्बाल मुकादम यांना प्रदान करण्यात येणार आहे. सक्सेस एडुकेशन सोसायटी ( शोएब सुर्वे ) कडून त्याचे हार्दिक अभिनंदन आणि खूप शुभेच्छा