नवी मुंबईचे सुपुत्र आणि सायबर सुरक्षा विशेषज्ञ, डॉ. शुभम पापळ यांना “उवा महाराष्ट्र फाउंडेशन” च्या वतीने महाराष्ट्र गौरव पुरस्कार 2024 ने सन्मानित करण्यात आले आहे. 20 ऑक्टोबर 2024 रोजी आयोजित या कार्यक्रमात, सायबर फॉरेन्सिकमधील त्यांच्या उल्लेखनीय योगदानासाठी त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
कार्यक्रमात कोहिनूर समूहाचे अध्यक्ष श्री. कृष्ण कुमार गोयल, प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या आणि भूमाता ब्रिगेडच्या संस्थापिका तृप्ती देसाई, तसेच अभिनेत्री निधी तपाडिया उपस्थित होत्या. या प्रतिष्ठित व्यक्तींच्या हस्ते डॉ. शुभम पापळ यांना हा मानाचा सन्मान मिळाला, जो त्यांच्या सायबर सुरक्षा आणि फॉरेन्सिक क्षेत्रातील उत्तम कामगिरीचा साक्ष आहे.
डॉ. शुभम पापळ यांनी सायबर गुन्हेगारी विरोधातील लढ्यात महत्वाची भूमिका बजावली आहे. त्यांनी सायबर फॉरेन्सिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून गुन्हे शोधण्यामध्ये महत्त्वाचे योगदान दिले आहे. त्यांच्या या यशामुळे नवी मुंबई शहरालाही अभिमान वाटत आहे.
महाराष्ट्र गौरव पुरस्कार हा त्यांच्या कार्याचे व त्यागाचे एक प्रतीक आहे आणि त्यांनी मिळवलेल्या या सन्मानामुळे सायबर सुरक्षा क्षेत्रातील युवा पीढीसाठी ते एक प्रेरणा ठरले आहेत.