महाराष्ट्र सरकारने राज्यातील बेरोजगार युवा विद्यार्थ्यांचे कल्याण साधण्यासाठी “माझा लाडका भाऊ योजना” सुरू केली आहे. या योजनेद्वारे राज्यातील बेरोजगार युवा विद्यार्थ्यांना रोजगाराशी जोडण्यासाठी मोफत व्यावसायिक कार्य प्रशिक्षण आणि कौशल्य प्रशिक्षण दिले जाईल. प्रशिक्षणासोबत आर्थिक मदत दिली जाईल. कौशल्य प्रशिक्षणादरम्यान विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू ठेवण्यासाठी आणि त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी ही मदत रक्कम दिली जाते. ही रक्कम प्राप्त करू इच्छिणाऱ्या कोणत्याही विद्यार्थ्याला विशिष्ट कालावधीसाठी कंपनी किंवा कारखान्यात प्रशिक्षण प्रक्रियेतून जावे लागेल. या योजनेद्वारे, सरकारने पात्र युवा विद्यार्थ्यांना १ वर्षासाठी कारखाना किंवा कंपनीत अप्रेंटिसशिप करायची योजना केली आहे. यामुळे त्यांना कामाचा अनुभव मिळेल, ज्याचा आधार घेतल्यास त्यांना पुढे जाऊन नोकरी मिळवण्यात मदत होईल.
योजनेची ठळक वैशिष्ट्ये
१. लाडका भाऊ योजनेअंतर्गत प्रशिक्षण घेत असलेल्या उमेदवारांना किमान वेतन कायदा, राज्य कामगार विमा कायदा, कामगार भविष्य निर्वाह निधी कायदा, कामगार नुकसान भरपाई कायदा व औद्योगिक विभाग कायदा लागू राहणार नाही.
२. केंद्र व राज्य शासनाच्या शासकीय/ निमशासकीय आस्थापना/ महामंडळे/ सहकारी संस्थांना मंजूर पदाच्या ५% इतके उमेदवार कार्य प्रशिक्षणासाठी घेऊ शकतात.
३. खाजगी क्षेत्रातील आस्थापनांना उद्योजकाकडे (लघु, मध्यम, मोठे उद्योग, स्टार्टअप्स) एकूण कार्यरत मनुष्यबळाच्या १०% उत्पादन, २०% सेवा क्षेत्रासाठी इतके उमेदवार कार्य प्रशिक्षणासाठी घेऊ शकतात.
४. सदर कार्य प्रशिक्षण (इंटर्नशिप) चा कालावधी ६ महिने असेल व या कालावधीसाठी उमेदवारांना या शासनामार्फत विद्यावेतन देण्यात येईल.
५. सदर विद्या वेतन लाभार्थ्याच्या थेट बँक खात्यात (DBT) जमा करण्यात येईल.
माझा लाडका भाऊ योजनेचे फायदे
१. या योजनेंतर्गत, पात्र व्यक्तीला १ वर्षासाठी कारखाना किंवा कंपनीमध्ये शिकाऊ बनवले जाईल.
२. ही संपूर्ण रक्कम लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर डीबीटीद्वारे पाठवली जाईल.
३. योजनेंतर्गत देण्यात येणाऱ्या आर्थिक मदतीमुळे तरुणांना स्वतःसाठी रोजगार मिळू शकेल.
४. शिकाऊ उमेदवारी दरम्यान, ६००० ते ८००० रुपये प्रति महिना स्टायपेंड देखील दिला जाईल.
५. दरवर्षी १० लाख बेरोजगार तरुणांना मोफत कौशल्य प्रशिक्षण देण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे.
६. या योजनेमुळे तरुणांमध्ये कौशल्य विकासाला चालना मिळेल.
७. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर, सर्व लाभार्थी संबंधित कंपनीत नोकरीसाठी अर्ज देखील करू शकतील.
माझा लाडका भाऊ योजनेसाठी पात्रता
या योजनेंतर्गत अर्ज करण्यासाठी आवश्यक पात्रता आणि अटी खालीलप्रमाणे आहेत:
१. फक्त मुलगेच अर्ज करू शकतात.
२. अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
३. अर्जदाराचे वय किमान १८ वर्षे आणि कमाल ३५ वर्षे असावे.
४. अर्जदाराची किमान शैक्षणिक पात्रता १२वी पास/ आय.टी.आय/ पदविका/ पदवीधर/ पदव्युत्तर असावा. मात्र शिक्षण चालू असलेले उमेदवार या योजनेत सहभागास पात्र असणार नाही.
५. अर्जदारास कोणत्याही अन्य भत्ता योजनेचा लाभ मिळत नसावा.
६. अर्जदार कोणत्याही रोजगाराशी संबंधित नसावा.
७. अर्जदाराचे बँक खाते आधार कार्डशी लिंक असणे आवश्यक आहे.
शैक्षणिक अहर्तेप्रमाणे विद्यावेतनाचे विवरण खालील प्रमाणे असेल
१. १२ वी पास : रुपये ६,०००/-
२. आय.टी.आय/ पदविका : रुपये ८,०००/-
३. पदवीधर/ पदव्युत्तर : रुपये १०,०००/-
लाडका भाऊ योजना
🎀आवश्यक कागदपत्रे🎀
१. आधार कार्ड
२. निवास प्रमाणपत्र
३. आय प्रमाणपत्र
४. वय प्रमाणपत्र
५. शैक्षणिक पात्रता दस्तऐवज
६. ईमेल आयडी
७. बँक खाते पासबुक
८. आधार लिंक मोबाइल नंबर
९. आधार लिंक ईमेल आय डी
१०. पासपोर्ट साइज फोटो
अधिक माहितीसाठी संपर्क करा:
Shoeb Surve 7208031234
New STEM Foundation