उलवे, खारघर आणि तळोज्यात बुधवार व गुरुवार पाणीपुरवठा बंद

बुधवार व गुरुवारी द्रोणागिरी, जेएनपीटी, उलवे, खारघर आणि तळोजा सिडको क्षेत्रातील पाणीपुरवठा बंद राहील. नवी मुंबई – हेटवणे धरण जलशुद्धीकरण केंद्र व जलवाहिनीवर देखभाल-दुरुस्तीचे काम सिडको महामंडळाने स्वीकारल्यामुळे बुधवारी आणि गुरुवारी द्रोणागिरी, जेएनपीटी, उलवे, खारघर, तळोजा या सिडको क्षेत्रात पाणीपुरवठा बंद राहील. यामुळे सिडको क्षेत्रातील रहिवाशांनी पाण्याची साठवणूक करण्याचे नियोजन करावे, असे आवाहन सिडकोने केले आहे. खारघर व तळोजा ह्या क्षेत्रातली सध्या […]
