कोलकाता नाईट रायडर्सचा मिस्ट्री स्पिनर सुनिस नरेनने इतिहास रचला आहे. सुनील नरेनने सनरायझर्स हैदराबादविरुद्ध एक विकेट घेत एक विक्रम आपल्या नावावर केला, जो या लीगमध्ये कोणताही गोलंदाज करू शकला नाही. IPL मध्ये एकाच संघाकडून खेळताना 200 बळी घेणारा सुनील नरेन हा पहिला गोलंदाज ठरला आहे. केकेआरसाठी त्याच्या नावावर 201 विकेट आहेत.

रविवारी सुनील नरेनने सनरायझर्स हैदराबादविरुद्ध 4 षटके टाकली, 31 धावांत 2 बळी घेतले. तसेच आयपीएल कारकिर्दीत विकेट्सचे ‘दुहेरी शतक’ करणारा तो तिसरा गोलंदाज ठरला. या स्पेशल क्लबमध्ये सामील होणारा नरेन हा पहिला विदेशी गोलंदाज आहे. आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स युजवेंद्र चहलच्या नावावर आहेत, ज्याने 182 सामन्यांत 228 विकेट घेतल्या आहेत, तर भुवनेश्वर कुमार 199 सामन्यांत 215 विकेट्स घेऊन दुसऱ्या स्थानावर आहे. या विक्रमी यादीत सुनील नरेन 197 सामन्यात 201 बळी घेत तिसऱ्या स्थानावर आहे.

2012, 2014 आणि 2024 मध्ये केकेआरला विजेतेपद मिळवून देण्यात सुनील नरेनने महत्त्वाची भूमिका बजावली होती. दरम्यान, त्याच्या वैयक्तिक कामगिरीचेही कौतुक झाले. नरेनने 2012, 2018 आणि 2024 मध्ये ‘मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयर’चा पुरस्कार पटकावला आहे. यासोबतच त्याने 2012 साली ‘पर्पल कॅप’ही जिंकली आहे.

हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद संघाने प्रथम फलंदाजी करताना 19 षटकांत केवळ 165 धावा केल्या होत्या. हैदराबादकडून ट्रॅव्हिस हेडने सर्वाधिक ६१ धावा केल्या, तर इशान किशनने ४२ धावांचे योगदान दिले. केकेआरकडून वरुण चक्रवर्तीने ३ आणि सुनील नरेनने २ बळी घेतले. यानंतर केकेआरने 19व्या षटकात केवळ तीन विकेट्स गमावून सामना जिंकला. केकेआरचा हा सलग तिसरा विजय ठरला.

हेही वाचा-

SRH vs KKR ठळक मुद्दे: कोलकाताचा विजय, हैदराबादवर 7 गडी राखून विजय; नरेन-चक्रवर्तीनंतर रहाणे-रघुवंशी चमकले



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *