बांगलादेश क्रिकेटमध्ये वाद सुरूच आहेत. बांगलादेश क्रिकेट बोर्डाच्या निवडणुका गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये झाल्या होत्या, ज्यामध्ये यापूर्वी अनियमिततेचे आरोप झाले होते. या आरोपांनंतर बांगलादेश सरकारने चौकशी समिती स्थापन केली होती. याच समितीने केलेल्या तपास अहवालात गेल्या वर्षी बीसीबीच्या निवडणुकीत हेराफेरी झाल्याचे, मतदारांना धाक दाखवून पक्षपात झाल्याचे समोर आले आहे. माजी न्यायमूर्ती एकेएम असदुझमान यांच्या नेतृत्वाखालील पाच सदस्यीय समितीने रविवारी आपला तपास अहवाल क्रीडा मंत्रालयाला सादर केला.
तपास अहवालातील खुलाशानुसार, ऑक्टोबरमध्ये झालेल्या ई-व्होटिंग प्रक्रियेचे आधीच नियोजन करण्यात आले होते. निवडणुकीच्या एक दिवस आधी म्हणजे 5 ऑक्टोबर 2025 रोजी मतदार एका ठिकाणी जमले होते, असे सांगण्यात आले. राष्ट्रीय क्रीडा परिषदेचे संचालक मोहम्मद अमिनुल अहसान यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत सांगितले की, निवडणूक प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक आणि मुक्त नव्हती. निवडणुकीपूर्वी मतदारांना धमकावण्यात आले.
बीसीबीचे अनेक वरिष्ठ अधिकारी तपासात सहकार्य करण्यास तयार नसल्याचे समितीने म्हटले आहे. गेल्या आठवड्यात, बीसीबीचे माजी अध्यक्ष अमिनुल इस्लाम बुलबुल यांनी एका मुलाखतीत सांगितले की मी मुलाखत देण्याऐवजी त्यांचे लेखी उत्तर चौकशी समितीकडे पाठवले होते.
एनएससीचे संचालक मोहम्मद अमिनुल अहसान यांनी सांगितले की, अमिनुल बुलबुल यांच्या अध्यक्षतेखालील बांगलादेश क्रिकेट बोर्ड विसर्जित करण्यासाठी सरकारला पुरेशी कारणे सापडली आहेत. बुलबुल यांना अध्यक्षपदावरून हटवल्यानंतर, माजी क्रिकेटपटू तमीम इक्बाल यांच्या नेतृत्वाखाली ११ सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती पुढील ३ महिने बीसीबीचे कामकाज पाहणार आहे. इक्बाल हे बीसीबीचे अंतरिम अध्यक्ष आहेत, त्यांनी गेल्या वर्षी निवडणुकीपूर्वी बुलबुलवर सत्तेचा गैरवापर केल्याचा आरोप केला होता.
हे देखील वाचा:
जोस बटलरने रचला इतिहास, आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध केला मोठा विक्रम; 600 षटकार पूर्ण केले
बांगलादेश क्रिकेट बोर्ड










