IPL 2026 सुरू होण्यापूर्वी गुजरात टायटन्सने विजय दहिया यांची सहाय्यक प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. विजय दहिया हा भारताचा माजी यष्टीरक्षक फलंदाज आहे आणि त्याने 19 एकदिवसीय आणि 2 कसोटी सामन्यांमध्ये भारतीय क्रिकेट संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये दिल्लीकडून खेळला आणि क्रिकेट कारकीर्द संपल्यानंतर तो कोचिंगमध्ये सक्रिय झाला.
गुजरात टायटन्स संघ आपल्या कोचिंग स्टाफला मजबूत करण्यात व्यस्त आहे. यापूर्वी, GT फ्रेंचायझीने अनुभवी ऑस्ट्रेलियन क्रिकेटर मॅथ्यू हेडनची फलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. त्यांच्या प्रशिक्षणाखाली दिल्लीने २००७-०८ ची रणजी ट्रॉफी जिंकली. भारतीय देशांतर्गत क्रिकेटमध्ये विजय दहियाचे नाव मोठ्या आदराने घेतले जाते.
त्याने यापूर्वी इंडियन प्रीमियर लीगमध्येही काम केले आहे. आयपीएलच्या 2022 आणि 2023 हंगामासाठी तो लखनौ सुपर जायंट्सचा सहाय्यक प्रशिक्षक होता. कोलकाता नाईट रायडर्सचे सहाय्यक प्रशिक्षक असण्यासोबतच तो दिल्ली कॅपिटल्सचा टॅलेंट स्काउट देखील आहे.
गुजरात टायटन्सची आयपीएलमधील कामगिरी
गुजरात टायटन्सने 2022 मध्ये इंडियन प्रीमियर लीगमध्ये प्रवेश केला. त्याच्या पहिल्याच हंगामात म्हणजेच IPL 2022 मध्ये, गुजरात ट्रॉफी जिंकण्यात यशस्वी ठरला. त्यानंतर, गुजरातने आयपीएल 2023 च्या अंतिम फेरीतही प्रवेश केला, परंतु अंतिम फेरीत त्यांना सीएसकेकडून 5 गडी राखून पराभव स्वीकारावा लागला.
आयपीएल 2024 मध्ये, गुजरात टायटन्स संघ प्लेऑफमध्येही जाऊ शकला नाही आणि गुणतालिकेत आठव्या स्थानावर समाधान मानावे लागले. गुजरातने 2025 च्या मोसमात पुनरागमन करत पुन्हा प्लेऑफमध्ये प्रवेश केला. एलिमिनेटरमध्ये मुंबई इंडियन्सकडून 20 धावांनी पराभव पत्करावा लागल्याने गुजरात संघ दुसऱ्या विजेतेपदापासून वंचित राहिला.
हे देखील वाचा:
IPL 2026 च्या पहिल्या मॅचमध्ये विराट कोहली खेळणार, पाहा कधी होणार रोहित आणि धोनीचा पहिला सामना?










