पहिल्या T20 सामन्यात झिम्बाब्वेने 125 धावा केल्या आहेत. नाणेफेक जिंकल्यानंतर टीम इंडियाने प्रथम गोलंदाजी निवडली. सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर मयंक यादवने यजमान झिम्बाब्वेला धक्का दिला. मयंक यादव, अशोक शर्मा आणि प्रिन्स यादव या तीन वेगवान गोलंदाजांपुढे झिम्बाब्वेच्या फलंदाजांना तग धरता आला नाही.
पहिल्याच चेंडूवर मयंक यादवने ब्रायन बेनेटला बाद करत सामन्याची सुरुवात विकेटने झाली. T20 डावातील पहिल्या चेंडूवर दोन किंवा अधिक वेळा विकेट घेणारा मयंक हा चौथा भारतीय गोलंदाज ठरला आहे. त्याच्याआधी भुवनेश्वर कुमार आणि हार्दिक पंड्या यांनी प्रत्येकी तीनदा अशी कामगिरी केली आहे, तर अर्शदीप सिंगने दोन वेळा टी-२० डावातील पहिल्या चेंडूवर विकेट घेतली आहे.
वेगाचा नवा बादशाह अशोक शर्मा याने या सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे. त्याने एकही विकेट घेतली नाही, पण घट्ट गोलंदाजी केली. त्याने 4 षटकात केवळ 29 धावा दिल्या. काही वेळातच धावसंख्या ६४ धावांपर्यंत पोहोचली तोपर्यंत झिम्बाब्वेचा निम्मा संघ पॅव्हेलियनमध्ये परतला होता.
दरम्यान, वेस्ली मधेवेरे आणि तदिवनाशे मारुमणी यांनी 57 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली आणि झिम्बाब्वेची धावसंख्या 100 च्या पुढे नेली.
अपडेट चालू आहे…
