वेगवान गोलंदाज हर्षित राणा टीम इंडियात सामील झाला आहे. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तिसरा एकदिवसीय सामना 20 जून रोजी चेन्नई येथे होणार आहे. त्याआधी हर्षित भारतीय संघात सामील झाला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) अधिकृत निवेदन जारी केले की हर्षित राणाने सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये त्याचे पुनर्वसन पूर्ण केले आहे आणि आता तो पूर्णपणे तंदुरुस्त आहे.
T20 विश्वचषक 2026 च्या सराव सामन्यादरम्यान हर्षित राणाला दुखापत झाली होती. दुखापतीमुळे तो विश्वचषक खेळू शकला नाही आणि IPL 2026 मधूनही तो बाहेर होता. हर्षित तब्बल साडेचार महिन्यांनंतर टीम इंडियात परतला आहे.
बीसीसीआयने आपल्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे – पुरुषांच्या निवड समितीने निर्णय घेतला आहे की अफगाणिस्तानविरुद्धच्या तिसऱ्या वनडेसाठी हर्षित राणाला भारतीय संघात स्थान द्यावे. हर्षितने सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये आपले पुनर्वसन पूर्ण केले आहे आणि चेन्नईत टीम इंडियामध्ये सामील झाला आहे.
निवड समितीने आयर्लंड आणि इंग्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी भारतीय संघात हर्षित राणाचाही समावेश केला आहे. अफगाणिस्तानविरुद्धची एकदिवसीय मालिका संपल्यानंतर भारतीय संघ ब्रिटनच्या दौऱ्यावर जाणार आहे. टीम इंडिया 26 जून आणि 28 जून रोजी आयर्लंडसोबत दोन सामन्यांची टी-20 मालिका खेळणार आहे. त्यानंतर भारताचा इंग्लंड दौरा 1 जुलैपासून सुरू होईल, जिथे उभय संघांमध्ये 5 टी-20 आणि 3 एकदिवसीय सामने खेळले जातील.
टीम इंडियाने मालिका जिंकली आहे
भारतीय संघाने यापूर्वीच अफगाणिस्तानविरुद्ध 3 सामन्यांची वनडे मालिका जिंकली आहे. टीम इंडियाने पहिल्या सामन्यात अफगाणिस्तानचा 7 गडी राखून पराभव केला आणि दुसरा सामना 170 धावांच्या मोठ्या फरकाने जिंकला. आता तिसरा एकदिवसीय सामना 20 जून रोजी चेन्नईत खेळवला जाईल.
हे देखील वाचा:
