IPL 2026 चा पहिला क्वालिफायर सामना धारशाला येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळवला जात आहे. या महत्त्वाच्या सामन्यात गुजरात टायटन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. गुजरात संघात मोठा बदल करण्यात आला आहे. या मोसमात प्रथमच डावखुरा वेगवान गोलंदाज कुलवंत खेजरोलियाला अंतिम अकरामध्ये स्थान मिळाले आहे. फिल सॉल्ट आजही आरसीबीकडून खेळत नाही.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची प्लेइंग इलेव्हन- व्यंकटेश अय्यर, विराट कोहलीदेवदत्त पडिक्कल, रजत पाटीदार (कर्णधार), जितेश शर्मा (यष्टीरक्षक), टिम डेव्हिड, कृणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, जेकब डफी, जोश हेझलवूड आणि रसिक सलाम दार.
गुजरात टायटन्सची प्लेइंग इलेव्हन- साई सुदर्शन, शुभमन गिल (कर्णधार), जोस बटलर (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, निशांत सिंधू, जेसन होल्डर, रशीद खान, कुलवंत खेजरोलिया, कागिसो रबाडा, मोहम्मद सिराज आणि प्रसीद कृष्णा.
यापैकी एक गुजरात टायटन्सचा प्रभावशाली खेळाडू असेल- राहुल तेवतिया, ग्लेन फिलिप्स, अनुज रावत, कुमार कुशाग्रा, साई किशोर
यापैकी एक असेल रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा प्रभावशाली खेळाडू- रोमारियो शेफर्ड, सुयश शर्मा, कनिष्क चौहान, अभिनंदन सिंग, जॉर्डन कॉक्स
पावसामुळे सामना रद्द, पुढे काय होणार?
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यातील क्वालिफायर-1 सामना धर्मशाला येथे खेळवला जात आहे. जर सामन्यात पाऊस असेल तर क्वालिफायर-1 साठी राखीव दिवस नाही. अशा परिस्थितीत सामना अधिकारी आजच सामना पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतील. पाऊस पडल्यास 120 मिनिटांचा अतिरिक्त वेळ देखील जोडला जाईल. 120 मिनिटांचा अतिरिक्त वेळ जोडूनही पाच षटकांचा सामना सुरू झाला नाही, तर सामना रद्द घोषित केला जाईल. क्वालिफायर-१ जिंकणारा संघ फायनलमध्ये जातो, पण पावसामुळे सामना सुरू होऊ शकला नाही, मग कोणता संघ अंतिम फेरीत जाणार, हा मोठा प्रश्न आहे.
क्वालिफायर-1 सामना रद्द झाल्यास, पॉइंट टेबलमधील चांगल्या स्थितीच्या आधारावर विजेता ठरवला जाईल. म्हणजेच गुणतालिकेत अव्वल स्थानावर असलेल्या संघाला अंतिम फेरीचे तिकीट मिळेल. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू पॉइंट टेबलमध्ये अव्वल स्थानावर होते, त्यामुळे आज पावसामुळे क्वालिफायर 1 सामना सुरू झाला नाही, तर RCB अंतिम फेरीत पोहोचेल.
हेही वाचा-










