मुंबई इंडियन्स आयपीएल 2026 मधून खूप आधी बाहेर पडली होती. पण संघाचा सलामीचा फलंदाज रायन रिक्लेटनने आपल्या अखेरच्या साखळी सामन्यात ऐतिहासिक कामगिरी केली आहे. मुंबई इंडियन्ससाठी सर्वाधिक षटकार मारण्याच्या बाबतीत त्याने सूर्यकुमार यादवची बरोबरी केली आहे.
रायन रिक्लेटनने राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात 12 धावा केल्या आणि या छोट्या डावात षटकार ठोकला. रायन रिक्लेटनने एका मोसमात मुंबई इंडियन्सकडून सर्वाधिक षटकार मारण्याच्या बाबतीत सूर्यकुमार यादवची बरोबरी केली आहे. रिक्लेटनने या मोसमात 38 षटकार मारले होते, तर सूर्यकुमारने गेल्या मोसमात एमआयसाठी तेवढेच षटकार मारले होते.
आयपीएल हंगामात सर्वाधिक षटकार (MI)
- 38 षटकार – सूर्यकुमार यादव – आयपीएल 2025
- 38 षटकार – रायन रिक्लेटन – आयपीएल 2026
- 31 षटकार – सनथ जयसूर्या – आयपीएल 2008
- 30 षटकार – इशान किशन – आयपीएल 2020
T20 क्रिकेटच्या एकूण आकडेवारीवर नजर टाकली तर मुंबई इंडियन्सकडून सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम रोहित शर्माच्या नावावर आहे. मुंबई इंडियन्सकडून खेळताना रोहितने आतापर्यंत 288 षटकार मारले आहेत. या यादीत सूर्यकुमार यादव तिसऱ्या क्रमांकावर आहे, ज्याच्या नावावर 156 षटकार आहेत.
रायन रिक्लेटनसाठी हा मोसम खूप चांगला गेला आहे. IPL 2026 स्पर्धेत तो मुंबई इंडियन्ससाठी सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. त्याने 12 सामन्यात 448 धावा केल्या. या काळात त्याने एक शतक आणि दोन अर्धशतकेही झळकावली.
दुसरीकडे, मुंबई इंडियन्ससाठी आतापर्यंत एकाही फलंदाजाला एका हंगामात ४० षटकारांचा आकडा गाठता आलेला नाही. मात्र या मोसमात राजस्थान रॉयल्सचा फलंदाज वैभव सूर्यवंशीने 53 षटकार ठोकले आहेत. एका मोसमात सर्वाधिक षटकार मारणारा तो भारतीय फलंदाज आहे.
हे देखील वाचा:











