आरसीबीने दिल्ली कॅपिटल्सचा 9 गडी राखून पराभव केला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने 81 चेंडू शिल्लक असताना सामना जिंकला. जोश हेझलवूड आणि भुवनेश्वर कुमार यांच्या घातक गोलंदाजीसमोर दिल्ली कॅपिटल्सचा संघ ७५ धावांत गारद झाला. प्रत्युत्तरात आरसीबीने 6.3 षटकांत सामना जिंकला. विराट कोहलीनेही आयपीएलमध्ये 9 हजार धावा पूर्ण केल्या. विराट 15 चेंडूत 23 धावा करून नाबाद तर देवदत्त पडिक्कल 13 चेंडूत 34 धावा करून नाबाद माघारी परतला. तर जेकब बेथेलने 11 चेंडूत 20 धावा केल्या. तत्पूर्वी, गोलंदाजीत हेजलवूडने चार तर भुवीने तीन बळी घेतले.
IPL 2026 च्या 39 व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने दिल्ली कॅपिटल्सचा 9 गडी राखून पराभव केला. धावांचा पाठलाग करताना, बेंगळुरूने केवळ 6.3 षटकांत म्हणजेच संघाने 13.3 षटकांतच विजय मिळवला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या दिल्लीचा संघ 16.3 षटकात अवघ्या 75 धावांत सर्वबाद झाला. पाठलाग करताना, देवदत्त पडिक्कलने 13 चेंडूत 3 चौकार आणि 3 षटकार मारून आरसीबीसाठी 34* धावांची सर्वात मोठी खेळी खेळली. त्याच स्पर्धेत विराट कोहली 9000 धावांचा टप्पा पार केला.
आयपीएलमध्ये विराट कोहलीच्या ९ हजार धावा
दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध ११ धावा केल्यानंतर किंग कोहलीने आयपीएलमध्ये ९ हजार धावा पूर्ण केल्या आहेत. आयपीएलमध्ये 9000 धावा करणारा तो पहिला फलंदाज ठरला आहे. विराटच्या या ऐतिहासिक कामगिरीचे प्रेक्षकांनी उभे राहून कौतुक केले. आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम यापूर्वीच आहे विराट कोहली चे नाव आहे.










