विराट कोहलीच्या 38 चेंडूत नाबाद 69 धावा आणि देवदत्त पडिक्कलच्या 26 चेंडूत केलेल्या 61 धावांच्या जोरावर आरसीबीने सनरायझर्स हैदराबादचा पराभव केला. सनरायझर्स हैदराबादने प्रथम खेळून २०१ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने अवघ्या 15.4 षटकांत लक्ष्य गाठले. अशा प्रकारे आरसीबीने आयपीएल 2026 ची सुरुवात विजयाने केली. इशान किशनने कर्णधार म्हणून पहिला सामना गमावला.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने IPL 2026 च्या पहिल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा 6 गडी राखून पराभव करून स्पर्धेच्या 19व्या हंगामाची सुरुवात केली. सामन्यात हैदराबादने प्रथम फलंदाजी करत 20 षटकात 201/9 धावा केल्या. प्रत्युत्तरात आरसीबीने 15.4 षटकांत 203/4 धावा करून विजय मिळवला. संघासाठी विराट कोहली सर्वात मोठी खेळी खेळताना त्याने 38 चेंडूत 5 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीने 69* धावा केल्या. हैदराबादकडून डेविन पेनने सर्वाधिक 2 बळी घेतले.
हेड टू हेड आकडेवारी
आरसीबी आणि हैदराबाद यांच्यात आतापर्यंत 25 सामने झाले आहेत. या सामन्यांमध्ये हैदराबादने आघाडी घेतली असून १३ सामने जिंकले आहेत. तर आरसीबीने ११ सामने जिंकले आहेत. दोघांमधील एक सामना अनिर्णित राहिला. हैदराबादचा वरचष्मा दिसत आहे. मात्र, आता आजच्या सामन्यात कोणता संघ बाजी मारतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची प्लेइंग इलेव्हन
विराट कोहली, फिल सॉल्ट, रजत पाटीदार (कर्णधार), जितेश शर्मा (यष्टीरक्षक), टीम डेव्हिड, रोमॅरियो शेफर्ड, कृणाल पांड्या, भुवनेश्वर कुमार, अभिनंदन सिंग, जेकब डफी आणि सुयश शर्मा.
सनरायझर्स हैदराबादची प्लेइंग इलेव्हन
अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड, इशान किशन (डब्ल्यूके/कॅप्टन), हेनरिक क्लासेन, अनिकेत वर्मा, नितीश कुमार रेड्डी, सलील अरोरा, हर्ष दुबे, हर्षल पटेल, जयदेव उनाडकट आणि इशान मलिंगा.











